Showing posts with label Udaipur Part-1. Show all posts
Showing posts with label Udaipur Part-1. Show all posts

November 3, 2025

उदयपूर डायरी – भाग १ : फ्लाइट, फराळ आणि फिल्मी ट्विस्ट!

 

उदयपूर

 

सप्टेंबर  महिन्यामध्ये अचानक  मी ,अदिती  आणि  भाऊ बहिणी  सर्वांनी  कुठेतरी  जायचे  ठरवले . संपूर्ण भारतभर चौकशी   करून झाल्यावर  मग आमचे  उदयपूर अखेर ठरले. ट्रिप म्हंटल्यावर मला ट्रिप ला जायचे त्यासाठी लागणारे प्लँनिंग करण्यात खूप आनंद  मिळतो. ठिकाण ठरल्यावर मी दोन तीन ठिकाणी चौकशी  केली . अखेर  आम्ही  अहमदाबाद ला फ्लाईट ने  जायचे  ठरवले  आणि  तिथून अहमदाबाद ते अहमदाबाद असा ट्रॅव्हल प्लँन केला.

मग आज अखेर जेवढे  बघितले नाही तेवढं इंस्टाग्राम वर उदयपूरला काय काय बघायचे बघून झाले. सगळे आम्ही खुश होतो.उदयपूरचा प्लॅन आम्ही १५ सप्टेंबर २०२५ ला ठरवला.

बुकिंग झालं, स्वप्नं रंगली, itinerary तयार झाला — “या वेळेस काहीच चुकवायचं नाही” असं ठाम ठरवलं होतं.कॅमेरा,बॅग सगळे तयार झाले. आम्ही वेदांत हॉलीडेज बेंगलोर मंदार फडके ह्यांच्या कडून बुक केले होते अहमदाबाद ते अहमदाबाद .

पण निसर्ग म्हणाला, “थांबा रे, पटकन घाई कुठे?” 😅 नियती आणि Star Air दोघांनाही आमचा आत्मविश्वास जरा जास्तच वाटला असावा. 😅

३ ऑक्टोबरला सकाळीच मेसेज आला —

 “Dear passenger, your flight from Ahmadabad to Belgaum is cancelled.”

त्या एका ओळीत सगळं थंड झालं. कॉफीही, मूडही. आणि अचानक गाणे आठवले  "अभी तो  पार्टी शुरु हुई हें ... ''

 

 

मग ७ ऑक्टोबर ला पुन्हा मेसेज आला.

"Dear Passenger. Your Flight from Belgaum to Ahmadabad is cancelled...''

 

इथे पुन्हा  एक गाणे आठवले."आज कि  रात होना हें क्या .पाना  हें क्या ... "

माझा लेखक मला  म्हणत होता. सिनेमा खरा आत्ता सुरु झाला आहे. टिकिटं महाग, पर्याय कमी… आणि आम्ही निवडलं Star Air – स्वस्त पण suspense भरपूर मस्त !” 🎬✈️

अखेर खटपट करून आम्ही रिटर्न फ्लाईट बुक केली . त्यासाठी पुण्यनगरी चा पर्याय आम्ही वापरला . आत्ता प्रश्न होता जाताना काय करायचे ?

अखेर तेव्हा आमच्या स्टार असलेल्या नशिबाने आम्हाला साथ दिली.

📩 Good news! Flight re-scheduled.” असा मेसेज आला आणि मला आणि सर्वांना जिवात जीव आला.बाकीची तयारी आमची झाली.

१८ ऑक्टोबर उजाडला. आणि ... मला शाहरुख चा डायलॉग आठवला.

“Picture abhi baaki hai mere dost!” 🎞

रात्री १०. ०० वाजता आम्हाला मेसेज आला.

 📩 “Your flight is rescheduled from 8.00 AM to 10.45 AM.”

त्या क्षणी आम्ही एकमेकांकडे पाहिलं —आणि  पुढे  काय  होणार ह्याचा  विचार न  करता शांतपणे दिवाळी फराळ करत आणि बॅग पॅक  करत "🎵 Kya Hua Tera Wada” हे गाणे मनातल्या  मनात गुणगुणत निघण्याच्या तयारीला लागलो.

क्रमशः